भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्याचा कोरोना अहवाल समाधानकारक; आज३६२रुग्ण कोरोना बाधित,८५७ कोरोना मुक्त

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने आलेल्या कोरोना अहवालात जिल्हाभरातून आज दिवसभरात ३६२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आजच ८५७ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून ९ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज जिल्हाभरातील आकडेवारी
जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण- २८, भुसावळ-४२, अमळनेर-३२, चोपडा-३१, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-२५, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-८, पारोळा-७, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१९, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ३६२ बाधित रूग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ३१३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २८ हजार २४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ७ हजार ८०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून ९ बाणित रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!