भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

सावधान ; जिल्ह्यात आज २२१ कोरोना रुग्ण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २२१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे ६ रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जळगाव शहर – ४३, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-१०७, अमळनेर-००, चोपडा-३२, पाचोरा-०५, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-०५, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण २२१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार ६०७ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ७६७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!