कोरोना वाढीचा वेग जळगाव जिल्ह्यासाठी चिंताजनक,आज ८८ कोरोना रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गेल्या तीन चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत आहे. प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आज ८८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.कोरोना ने जिल्ह्याचीही चिंता वाढवली हे मात्र नक्की.
जळगाव शहर – ३१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-२४, अमळनेर-००, चोपडा-२७, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-०१, पारोळा-००, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार ०४० पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २३३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.