जळगाव जिल्ह्यात आज १२९ रुग्ण कोरोना बाधित,२ रुग्णाचा मृत्यू
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्हाभरात १२९ बाधित रूग्ण आढळले आहे तर ५४१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-४, भडगाव-३ , धरणगाव-०, यावल-३, एरंडोल-३३, जामनेर-९, रावेर-७, पारोळा-८, चाळीसगाव-२२, मुक्ताईनगर-१, बोदवड-३ आणि इतर जिल्हे ३ असे एकुण १२९ बाधित रूग्ण आढळले आहे.
जिल्ह्यातील आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४० हजार ७३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३४ हजार ७६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३ हजार ४१५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून २ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे