जळगाव जिल्ह्यात आज केवळ ७ रुग्ण कोरोना बाधित
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। आज आलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच एका रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
आजची रुग्ण संख्या–जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.जिल्हात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ४३१ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५७१ कोरोनामुक्त झाले आहे. आता पर्यंत २५७४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे,तर २८६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.