आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात वेग मंदावतोय !आज ६८१ कोरोना बाधित रुग्ण .

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयातुन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठविलेल्या कोरोना अहवालात आज देखील दिलासादायक रूग्ण संख्या दिसून आली. दिवसभरात जिल्ह्यात ६८१ बाधित रूग्ण आढळले तर ८११ रूग्ण कोरानामुक्त तर आज ९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाभरातील तालुका निहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर-६०, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८२, अमळनेर-२९, चोपडा-६८, पाचोरा-४, भडगाव-३, धरणगाव-२९, यावल-३२, एरंडोल-४४, जामनेर-१६, रावेर-४७, पारोळा-३५, चाळीसगाव-९२, मुक्ताईनगर-७२, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील १८ असे एकुण ६८१ बाधित रूग्ण आढळून आले आहे,जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३३ हजार ८९३ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख २१ हजार ७८२ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत तर ९ हजार ७१६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!