जिल्ह्यात आज ८५८ रुग्ण कोरोना बाधित,१००५ रुग्ण बरे तर १६ रुग्णाचा मृत्यू
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या महिती नुसार कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात ८५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर १००५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ, चाळीसगाव पाचोरा,तालुक्यात संसर्ग वाढलेला दिसून येत आहे.
जळगाव शहर- १३४, जळगाव ग्रामीण-३५, भुसावळ-१२०, अमळनेर-२५, चोपडा-४१, पाचोरा-७५, भडगाव-९, धरणगाव-२२, यावल-३२, एरंडोल-२३, जामनेर-५९, रावेर-३२, पारोळा-२३, चाळीसगाव- १०७, मुक्ताईनगर-६५, बोदवड-४७ आणि इतर जिल्ह्यातील ९ असे एकुण ८५८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.अशी
जिल्ह्यातील आजची आकडेवारी असून , जिल्ह्यात आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख २७ हजार ३११ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १५ हजार ४५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ५४९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजच्या अहवालानुसार दिवसभरात १६ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली .