भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जिल्ह्यात आज १०७० कोरोना बाधित: १०९७ झाले बरे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात आज कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्याची संख्या अधिक असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०७० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०९७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १९१, जळगाव ग्रामीण-५७, भुसावळ- १२०, अमळनेर-१७१, चोपडा-५५, पाचोरा-३३, भडगाव-२१, धरणगाव-४४, यावल-४२, एरंडोल-४१, जामनेर-७७, रावेर-४५, पारोळा-३७, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-५४, बोदवड-३१, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण १०७० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ११६ हजार ८६८ पर्यंत पोहचली असून १०३ हजार ८९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज वीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २०७८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०८९९ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!