जळगाव जिल्ह्यात १६९ रुग्ण कोरोना बाधित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर ५५ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे.
जळगाव शहर- ८४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१२, अमळनेर-५, चोपडा-४, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-६, रावेर- ३, पारोळा-७, चाळीसगाव-२३, मुक्ताईनगर-१०, बोदवड-० आणि इतरजिलह्यातील ३ असे एकुण १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकुण बाधितांची ५८ हजार २१ रूग्ण संख्या पोहचली आहे. त्यापैकी ५५ हजार ९८५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६६७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज सुदैवाने एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडूने दिली आहे.