जिल्ह्यात ६१८ कोरोना बाधित; ६७० जणांची यशस्वी मात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावताना दिसत असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६१८ कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ६७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (५२ ने) जास्त असून ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (६३ ने) झाली कमी आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी– जळगाव शहर-६६, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ- ५७, अमळनेर-३९, चोपडा-८५, पाचोरा-६, भडगाव-४, धरणगाव-३५, यावल-३४, एरंडोल-४५, जामनेर-६०, रावेर-३२, पारोळा-००, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-३२, बोदवड-३५, इतर जिल्ह्यातील-४ असे एकुण ६१८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३४ हजार ५११ पर्यंत पोहचली असून १२२ हजार ४५२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २४०६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९६५३ रुग्ण सध्या उपचार घेताय.