जिल्ह्यात १०४८ जणांना कोरोनाचा संसर्ग: दिवसभरात २१ रुग्णाचा मृत्यू !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा वेग कायम असुन जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०४८ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०१५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून मृतांचा आकडा मात्र निसत नाही आज दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी– जळगाव शहर – १५९, जळगाव ग्रामीण-५३, भुसावळ- १५७, अमळनेर-७१, चोपडा-७२, पाचोरा-५७, भडगाव-१८, धरणगाव-४२, यावल-३३, एरंडोल-११३, जामनेर-३७, रावेर-७४, पारोळा-२८, चाळीसगाव-६६, मुक्ताईनगर-३७, बोदवड-१५, इतर जिल्ह्यातील-१६ असे एकुण १०४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ११७ हजार ९१६ पर्यंत पोहचली असून १०४ हजार ९०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २०९९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०९११ रुग्ण सध्या उपचार घेताय.