जळगाव जिल्ह्यातील आठ खाजगी कोविड रुग्णालयांना शल्यचिकित्सकांची नोटीस
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। नियमाचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आठ रुग्णालयांना नोटीस बजावली. त्यात जळगाव शहरातील तीन, चाळीसगाव येथील दोन तर जामनेर, चोपडा, पाचोरा येथील प्रत्येकी एका रुग्णालयाचा समावेश आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत संलग्न असलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर योजनेचा लाभ न देता इतर रुग्णांप्रमाणे बिल आकारले.नोटीस दिलेल्या रुग्णालयाची खालील प्रमाणे यादी…
१) ऑर्किड हॉस्पिटल,जळगाव,
२)महाजन हॉस्पिटल,जळगाव,
३)अश्विनी हॉस्पिटल (जळगाव),
४)बापजी जीवनदीप हॉस्पिटल चाळीसगाव,
५)कृष्णा क्रिटीकल चाळीसगाव,
६)जीएम हॉस्पिटल (जामनेर),
७)विघ्नहर्ता हॉस्पिटल (पाचोरा),
८)श्री नृशिंह हॉस्पिटल (चोपडा)