भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख; आज ३१८ नविन बाधित !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३१८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर १३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १२३, जळगाव ग्रामीण-०९, भुसावळ- २४, अमळनेर- ११, चोपडा-३०, पाचोरा-००, भडगाव-०५, धरणगाव-१६, यावल-१०, एरंडोल-०२, जामनेर-१९, रावेर-१४, पारोळा-११, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-११, बोदवड-०२, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण ३१८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६० हजार १८२ पर्यंत पोहचली असून ५६ हजार ६८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आज १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १३८३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २११० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!