जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन टॅंक रिकामे; बॅक-उप साठ्यातून पुरवठा !
जळगाव/प्रतिनिधी: येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन टॅंक साडेसात वाजता रिकामा झाल्याने रुग्णालयातील रुग्ण सध्या सिलेंडर व्यवस्थेवर अवलंबून आहेत.सध्याला बॅक-उप ऑक्सिजन पुरवठा बऱ्या पैकी असल्याचे समजत असून दरम्यान, ऑक्सीजन घेऊन येणार्या टँकरच्या चालकाचा संपर्क तुटल्याने आरोग्य यंत्रणेत चिंता निर्माण झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जिल्हा रुग्णालय येथे कोविडग्रस्त नागरिकांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सीजनचा टँकर हा आज सायंकाळपर्यंत जिल्हा रूग्णालयात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत हा टँकर आलेला नाही रुग्णालय प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्थेसाठी ठेवण्यात आलेल्या सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला असून त्यापाठोपाठ आणखी सिलेंडर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सध्याला बॅक-उप ऑक्सिजन बऱ्या पैकी प्राणवायू उपलब्ध आहे.
दरम्यान, ऑक्सिजन घेऊन येत असलेला टँकर संपर्क तुटल्याने समजत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप वैद्यकीय अधीक्षक संगीता गावीत, ऑक्सिजन समितीचे डॉ.संदीप पटेल, संजय चौधरी यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी प्रत्येक कक्षात लक्ष ठेऊन आहेत. कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आम्ही दुसरी व्यवस्था करून ठेवलेली आहे. दरम्यान, ऑक्सीजनवर असणार्या प्रत्येक रूग्णाला नियमीतपणे ऑक्सीजन मिळणार वैद्यकीय अधिकारी यांच्या कडुन सांगिण्यात आले आहे.