जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या स्थिर,आज जळगाव जिल्ह्यात ८४४ बाधित रुग्ण.
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८४४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ८२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ६१, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ- १३२, अमळनेर-१२, चोपडा-१५०, पाचोरा-२०, भडगाव-१५, धरणगाव-६०, यावल-२३, एरंडोल-७४, जामनेर-४७, रावेर-२६, पारोळा-०३, चाळीसगाव-९४, मुक्ताईनगर-५२, बोदवड-४९, इतर जिल्ह्यातील-१० असे एकुण ८४४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३० हजार ७३१ पर्यंत पोहचली असून ११८ हजार ५६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २३४९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९८१४ रुग्ण सध्या उपचार घेताय.