जिल्ह्यात आज १०४६ कोरोना संक्रमित: १००६ रुग्ण झाले बरे !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम असून आजही १ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. आज जिल्ह्यात १०४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर १००६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून जळगाव, चोपडा, एरंडोल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यात संसर्ग कायम आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी– जळगाव शहर- १६५, जळगाव ग्रामीण- ३२, भुसावळ-९७, अमळनेर-४१, चोपडा- ११०, पाचोरा- ६०, भडगाव-२७, धरणगाव- ३०, यावल- ३६, एरंडोल- १०१, जामनेर- ६३, रावेर- १०२, पारोळा- ३७, चाळीसगाव- ४३, मुक्ताईनगर- ४३, बोदवड- २२ आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १०४६ बाधित रूग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात आजच्या बाधित रूग्णांमुळे एकुण १ लाख १५ हजार ७९८ बाधित रूग्णांची संख्या झाली असून त्यापैकी १ लाख २ हजार ७९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ९४६ बाधित रूग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २०५८ वर गेला आहे.