दिलासा ! कोरोनाचा वेग मंदावला: १२०४ रुग्णांचा कोरोनाला खो, १०३४ रुग्ण बाधित !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने घेतलेली आघाडी आता मंदावल्याची दिसून येत असून जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या २३० ने जास्त तर ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही २०२ ने कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०३४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १२०४ रुग्णांनी कोरोनाला खो-…देत यशस्वी मात केली असून आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी– जळगाव शहर-१७५, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ- ८६, अमळनेर-६७, चोपडा-५८, पाचोरा-५३, भडगाव-१०, धरणगाव-४२, यावल-६७, एरंडोल-५४, जामनेर-१११, रावेर-९६, पारोळा-२४, चाळीसगाव-४९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-७०, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण १०३४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात रुग्णांची एकुण संख्या ११३ हजार ७०४ पर्यंत पोहचली असून १०० हजार ७५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २०१६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०९३० रुग्ण सध्या उपचार घेताय.