भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; आज १२०५ पॉझिटिव्ह, १४ रुग्ण दगावले !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोनाचा विस्‍फोट सुरूच असून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १२०५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनंदिन रुग्णसंख्येचा नवनवीन उच्चांक गाठत असून तर दिवसाला मोठ्या संख्येत मृत्यू होत आहेत, दैनंदिन बाधित रुग्णांचे जुने विक्रम मोडीत काढत नवे विक्रम स्थापन होत आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून मृत्यूच्या संख्येत दोन अंकी आकडा गाठत असतानाचे वास्तव आहे, आज १२०५ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे.

जळगाव शहर २८०, जळगाव तालुका-५०; भुसावळ ३६, अमळनेर- ९३; चोपडा- ३९२; पाचोरा ३३; भडगाव ६३; धरणगाव २९; यावल २६; एरंडोल २०,  जामनेर ६१; रावेर ३७, पारोळा १०; चाळीसगाव २६; मुक्ताईनगर ३०; बोदवड-१६ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे १२०५ रूग्ण आढळून आले आहेत.

सातत्‍याने आकडा वाढत असून संपुर्ण जिल्‍हा आता हॉटस्‍पॉट बनला आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८६ हजार ६८८ झाली आहे. त्यात एकूण ७३ हजार ६६५ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत असून सद्यस्‍थितीत ११ हजार ४२६ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज पुन्हा जिल्ह्यात १४ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १ हजार ५९७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!