जिल्ह्यात आज बाधित रुग्णांपेक्षा कोरोनाला मात देत बरे होणारे अधिक !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात आज आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना संसर्गाचा वेग कमी होताना दिसत असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्याची संख्या आज जास्त असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९३६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजची जिल्ह्यातील आकडेवारी– जळगाव शहर – १५३, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ- १३१, अमळनेर-९६, चोपडा-४२, पाचोरा-५८, भडगाव-१८, धरणगाव-३०, यावल-३३, एरंडोल-२६, जामनेर-५२, रावेर-६५, पारोळा-२२, चाळीसगाव-८६, मुक्ताईनगर-२५, बोदवड-४८, इतर जिल्ह्यातील-१७ असे एकुण ९३६ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२२ हजार ९४० पर्यंत पोहचली असून ११० हजार २२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२०० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०५२० रुग्ण सध्या उपचार घेताय.