आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विक्रमी आकडा; दिवसभरात १०९० रुग्ण, ११ मृत्यू !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०९० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे तर सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले आहेत.

दैनंदिन बाधित रुग्णांचे जुने विक्रम मोडीत काढत नवे विक्रम स्थापन होत आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना अचानक मृत्यूच्या संख्येने दोन अंकी आकडा गाठला आहे, आज १०९० रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे.

तालुकानिहाय आकडेवारीजळगाव शहर – ४४४,जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ- ११९, अमळनेर-५०, चोपडा-७६, पाचोरा-२६, भडगाव-१४, धरणगाव-६१, यावल-१७, एरंडोल-४०, जामनेर-६९, रावेर-१३, पारोळा-१७, चाळीसगाव-५६, मुक्ताईनगर-४२, बोदवड-०९, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण १०९० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ७८ हजार ४७० पर्यंत पोहचली असून ६७ हजार ०९६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५०१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९८७३ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!