पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कातील लोकांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे.
पालकमंत्री गा. गुलाबराव पाटील हे जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ठाणे येथून महापालिका निवडणुकीची डावपेच खेळत होते या दरम्यान त्यांना थोडी लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी चाचणी असता त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. खासगी रूग्णालयात उपचार घेत असून प्रकृती चांगली आहे. परंतु, आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन ना. पाटील यांनी केले आहे.