भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्या कोरोना मुक्तीच्या मार्गावर,आज ८० रुग्ण बाधित

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)।जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला असून लवकरच जळगाव जिल्हा कोरोना मुक्त होईल असे आजच्या कोरोना बाधित रुग्णांवरून दिसते आज ८० रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून २५२ रूग्णांनी कोरोनावर मात करून घरी परत गेले.

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी कमी होत आहे सातत्याने कोरोना रूग्ण संख्येत घटच पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ८० कोरोना बाधीत आढळून आले असून २५२ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून गत चोवीस तासांमध्ये एक रूग्णाचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यातील तालुक्यानुसार विचार केला असता; धरणगाव व मुक्ताईनगरात गत चोवीस तासांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाही. जळगाव शहर – ०५, जळगाव ग्रामीण-१०, भुसावळ-०६, अमळनेर-०४, चोपडा-०३, पाचोरा-०७, भडगाव-०४, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-०२, जामनेर-०३, रावेर-०२, पारोळा-०६, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ८० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार २८९ पर्यंत पोहचली असून १३६ हजार ४४२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५५९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २२८८ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!