जळगाव जिल्ह्यात दिलासा मात्र जामनेर मध्ये कोरोनाचा कहर
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६३१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जामनेरात आज सर्वाधिक १४५ रुग्ण आढळून आले आहेत.
जळगाव शहर – ३३, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ- ५४, अमळनेर-३३, चोपडा-१९, पाचोरा-५२, भडगाव-००, धरणगाव-३६, यावल-१५, एरंडोल-२३, जामनेर-१४५, रावेर-३२, पारोळा-३८, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-०९, बोदवड-३६, इतर जिल्ह्यातील-०५ असे एकुण ६३१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १,३५,१४२ पर्यंत पोहचली असून १२३०२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २४१७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९६९६ रुग्ण सध्या उपचार घेताय.