भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

कोरोनाग्रस्त रूग्णांना भेटण्यास सक्त मनाई;नवीन नियम जाणून घ्या.

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी येत असतात त्या मुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो म्हणून ,कोविड संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर, कोरोनाग्रस्त रूग्णांना भेटण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली असून याबाबतचे निर्देश आज जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले असून नवीन सक्त नियम व नियमाचे पालना बाबत निर्देश जरी केले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पश्वभूमीवर सध्या कडक निर्बंध सुरू असले तरी याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्ह्यात सर्व नियमांचे पालन करण्यात यावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यात अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांना त्यांचे आप्त,नातेवाईक भेटण्यासाठी येत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत असल्याने याची दखल घेत जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी रूग्णांना भेटण्याची सक्त मनाई केली आहे. यामुळे आता कुणालाही रूग्णाला खाद्यपदार्थ द्यावयाचे असतील तर ते हॉस्पीटलमधील कर्मचार्‍यांना द्यावे लागतील. तसेच भेटायची आवश्यकता भासल्यास व्हिडीओ कॉलींगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. अत्यावश्यक बाब असल्यास रूग्णांना त्यांचे नातेवाईक पीपीई किट घालून भेटू शकतात.असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!