भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

परदेशातून जळगावमध्ये आलेल्या ९ प्रवाशांची करोना चाचणी; रिपोर्टही आले!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं मंगळवारी परदेशातून नऊ प्रवासी आले आहेत. या सर्व प्रवाशांची विमानतळावर उतल्यानंतरच करोनाची आरटीपीसीआरची चाचणी करण्यात आली. सर्वच्या सर्व नऊ प्रवाशांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठव्या दिवशी संबधितांची पुन्हा चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दक्षिण आफ्रिकेसह इतर काही देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जळगाव जिल्ह्यात बाहेरच्या देशातून येणार्‍या प्रत्येक नागरिकावर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. जळगाव विमानळावर परदेशातून परतणार्‍या नागरिकांबाबत माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी विमानतळ प्रशासनाला दिले आहेत.

दक्षिण आफ्रिकेसह इतर काही देशांमध्ये करोना प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. अशा देशांमधून आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात एकही नागरिक पतरला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. मंगळवारी चोपडा येथे काही देशांमधून ९ जण आले आहेत, मात्र ते हायरिस्क देशांमधील नाहीत. संबंधितांची विमानळावरच आरटीपीआरची चाचणी करण्यात आली. या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!