जळगाव जिल्ह्यात आज केवळ ५
रुग्ण कोरोना बाधीत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आजची रुग्ण संख्या— जळगाव शहर – ००, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०१, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४२ हजार ४८० पर्यंत पोहचली असून १३९ हजार ७१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १८९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.