जिल्ह्यात कोरोनाचा आलेख उंचावला; दिवसभरात ९८३ जण बाधित !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आज जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून जिल्ह्यात आज ९८३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४४१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजची आकडेवारी– जळगाव शहर – २२२, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ- ५७, अमळनेर- ५८, चोपडा-१३३, पाचोरा-१७, भडगाव-१५, धरणगाव-७१, यावल-१३, एरंडोल-०२, जामनेर-१६३, रावेर-३२, पारोळा-३०, चाळीसगाव-१०२, मुक्ताईनगर-२४, बोदवड-१७, इतर जिल्ह्यातील-०९ असे एकुण ९८३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६६ हजार ७२६ पर्यंत पोहचली असून ५९ हजार ५८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ५७२५ रुग्ण सध्या उपचार घेत असून आज सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४२१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.