भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात नविन २७९ रुग्ण कोरोना बाधित !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले असून १३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करत बरे झाले आहे, तर आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आकडेवारी खालील प्रमाणे– जळगाव शहर १२२, जळगाव ग्रामीण ०९, भुसावळ ०४, अमळनेर ०२, चोपडा ३३, पाचोरा १०, भडगाव ०१, धरणगाव ०२, यावल ०५, एरंडोल ०१, जामनेर १८, रावेर ०१, पारोळा ०२, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर २०, बोदवड ०१, इतर जिल्ह्यातील ०३ असे एकुण २७९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५९ हजार ८६४ पर्यंत पोहचली असून ५६ हजार ५५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १९२९ रुग्ण सध्या उपचार घेताय. आतापर्यंत १३८१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!