जळगाव जिल्ह्यात कोरोना फोपावतोय; आज ९२१ जणांना बाधा !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग कायम असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९२१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५०४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २७०, जळगाव ग्रामीण-६३, भुसावळ- ३२, अमळनेर-००, चोपडा-१८१, पाचोरा-१९, भडगाव-१२, धरणगाव-६१, यावल-१८, एरंडोल-१२२, जामनेर-६७, रावेर-०५, पारोळा-२४, चाळीसगाव-४३, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ९२१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ७५ हजार ४१५ पर्यंत पोहचली असून ६४ हजार ७१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४७४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९२२३ रुग्ण सध्या उपचार घेताय.