जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग कायम; रुग्ण संख्येत मोठी भर !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाचा झपाट्याने वाढत आहे. रविवारी देखील सलग पाचव्या दिवशी नऊशेपार नविन बाधित रुग्ण आढळून आले आहे, जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९७९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ६६७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी– जळगाव शहर – ३७६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ- १३७, अमळनेर- १६, चोपडा-१०१, पाचोरा-२७, भडगाव-३२, धरणगाव-८२, यावल-१२, एरंडोल-९२, जामनेर-३४, रावेर-१४, पारोळा-०४, चाळीसगाव-१०, मुक्ताईनगर-००, बोदवड-१९, इतर जिल्ह्यातील-१२ असे एकुण ९७९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ७० हजार ६२७ पर्यंत पोहचली असून ६१ हजार ६०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४४४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ७५८१ रुग्ण सध्या उपचार घेताय.