भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

Jalgaon। जिल्ह्यात १०४८ जण कोरोना बाधित, १०३० रुग्ण बरे !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०४८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आकडेवारी– जळगाव शहर – २०४, जळगाव ग्रामीण-२८, भुसावळ- ९०, अमळनेर-८४, चोपडा-८४, पाचोरा-५३, भडगाव-२८, धरणगाव-३४, यावल-३७, एरंडोल-२०, जामनेर-१०५, रावेर-९७, पारोळा-४६, चाळीसगाव-५०, मुक्ताईनगर-३१, बोदवड-२६, इतर जिल्ह्यातील-३१ असे एकुण १०४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ११४ हजार ७५२ पर्यंत पोहचली असून १०१ हजार ७८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २०३७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०९२७ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!