जिल्ह्यात १०५९ जणांना कोरोनाचा संसर्ग; १०७४ झाले बरे, २२ रुग्णाचा मृत्यू !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ हजार ५९ रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार ७४ रूग्ण बरे होवून घरी परतले असून २२ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकंदरीत पॉझिटिव्ह रुग्ण संख्ये पेक्षा बरे होणाऱ्याची संख्या अधिक असली तरी मात्र, मृतांचा आकडा वाढतांना दिसत आहे.
जिल्हाभरातील कोरोनाची आजची आकडेवारी– जळगाव शहर-१९०, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१६१, अमळनेर-२२, चोपडा-१३२, पाचोरा-६६, भडगाव-५२, धरणगाव-४२, यावल-६५, एरंडोल-६७, जामनेर-६८, रावेर-३९, पारोळा-३७, चाळभ्सगाव-३६, मुक्ताईनगर-८, बोदवड-४९ आणि इतर जिल्ह्यातील १३ असे एकुण १ हजार ५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ९ हजार २७७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९६ हजार १५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार १९३ रूग्ण रूग्णालयात व कोविड सेंटरला उपचार घेत असून आज दिवसभरात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे