भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

Covid-19; जळगाव जिल्ह्यात आज ११४१ कोरोना बाधित; १४ मृत्यू !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११४१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०७१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-१६८, जळगाव ग्रामीण-२७, भुसावळ-१०२, अमळनेर-५३, चोपडा-७९, पाचोरा-१२१, भडगाव-३२, धरणगाव-५५, यावल-६२, एरंडोल-४१, जामनेर-४४, रावेर-८८, पारोळा-३७, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-९२, बोदवड-१०३, इतर जिल्ह्यातील-०५ असे एकुण ११४१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ९७ हजार ०९९ पर्यंत पोहचली असून ८३ हजार ६७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १७२६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११७०२ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!