जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत भर! १०३३ संक्रमित ; २० जण दगावले !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात दिवसभरातील कोरोना संक्रमित आकड्याने पुन्हा एकदा हजारी पार केली असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०३३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११०३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी– जळगाव शहर – २१२, जळगाव ग्रामीण-५८, भुसावळ- १३०, अमळनेर-१०५, चोपडा-८७, पाचोरा-७९, भडगाव-१०, धरणगाव-५३, यावल-३०, एरंडोल-४९, जामनेर-१९, रावेर-८४, पारोळा-२७, चाळीसगाव-३७, मुक्ताईनगर-३२, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-२० असे एकुण १०३३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १०७ हजार १०३ पर्यंत पोहचली असून ९३ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज वीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १८८८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११२३९ रुग्ण सध्या उपचार घेताय.