जिल्ह्यात १११५ जणांना कोरोनाचा संसर्ग; २१ रुग्णाचा मृत्यू !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात संसर्गाचा वेग कायम असून जिल्हा जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १११५ रूग्ण कोरोना संक्रमित आढळून आले असून ११०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आजही २१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हातील आजची आकडेवारी– जळगाव शहर-२६०, जळगाव ग्रामीण-१५, भुसावळ-२१३, अमळनेर-१७, चोपडा-१२२, पाचोरा-३६, भडगाव-१०, धरणगाव-४५, यावल-३८, एरंडोल-५८, जामनेर-६५, रावेर-७७, पारोळा-३१, चाळीसगाव -४६, मुक्ताईनगर-४२, बोदवड-३४ व इतर जिल्ह्यातील ८ असे एकुण १११५ बाधित रूग्ण बाधित आढळून आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ८ हजार २१८ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ९५०७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार २३० रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरातून एकुण २१ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.