जळगाव जिल्ह्यात आज ११९४ जणांना संसर्ग; १२२४ जणांची कोरोनावर मात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग सुरूच असून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११९४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १२२४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २३२, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ- ३६, अमळनेर-१०७, चोपडा-२००, पाचोरा-४२, भडगाव-३४, धरणगाव-९०, यावल-२२, एरंडोल-४२, जामनेर-८९, रावेर-१३, पारोळा-१७, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-७३, बोदवड-०८, इतर जिल्ह्यातील-१२ असे एकुण ११९४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ९२ हजार ४२१ पर्यंत पोहचली असून ७९ हजार १८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १६६८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११५७३ रुग्ण सध्या उपचार घेताय.