धावत्या रेल्वेखाली ५० वर्षीय प्रौढाची जळगावात आत्महत्या !
जळगाव (प्रतिनिधी)। शिवकॉलनी उड्डाण पुलाजवळ शहरातील श्रध्दा कॉलनीत राहणाऱ्या ५० वर्षीय प्रौढाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त अशे की, शहरातील श्रध्दा कॉलनीतील रहिवासी विजय छगन अहिरे (वय-५०) हे बस महामंडळाच्या कार्यशाळेत मेकॅनिक म्हणून कामाला होते. काल दुपारी १२.३० ला बाहेर जावून येतो असे सांगत रामानंद नगर जवळी गिरणा टाकीजवळील बियर शॉपीसमोर त्यांनी आपली दुचाकी पार्क केली. दरम्यान, तेथेच त्याच्या दुचाकीच्या बाजूला सारखीच एकाच रंगाची व कंपनीची दुसरी दुचाकी अनोळखी व्यक्तीने पार्क केली. दोन्ही गाड्या सारख्याच असल्याने अनोळखी व्यक्तीने विजय अहिरे यांची दुचाकीला चावी लावून घेऊन गेल्याने, आपली दुचाकी चोरीला गेल्याचे त्याचा लक्षात आले, त्यानंतर ३:३० वाजेच्या सुमारास दुपारी विजय अहिरे यांनी शिवकॉलनी जवळ असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.