विवाहितेचा पैशासाठी छळ : शिवीगाळ करत मारहाण, गुन्हा दाखल !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशासाठी छळ करत शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात सहा जणंविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील जोशी वाडा येथील माहेर असलेल्या रेहानाबह कुरबान खान (वय-२५) यांचा विवाह जळगावातीलच आझाद नगर, पिंप्राळा येथील कुरबान खान इस्माईल खान याच्यासोबत रितीरिवाजानुसार झाला असून सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती कुरबान खान याने विवाहितेला माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावत छळ करण्यात येत होता. माहेरची परिस्थिती जेमतेम असल्याने विवाहितेने माहेरून पैसे आणू शकली नाही.
यामुळे पती कुरबान खान याला त्याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासू, सासरे दिन आणि नणंद यांनी देखील विवाहितेकडे माहेरून पैशांचा तगादा लावत होत्या यासर्व छळाला कंटाळून विवाहिता माहेरी राहायला आल्यानंतर ६ एप्रिल रोजी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडित विवाहितेचा फिर्यादीवरून पती कुरबान खान इस्माइल खान, सासरे इस्माईल खान, सासु फरिदा खान इस्माईल खान, दीर शेर खान इस्माईल खान, सुभान खान इस्माईल खान आणि सुलतानाबी हसन खान सर्व रा. आजाद नगर, पिंप्राळा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.