भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ : सासरच्यावर गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : घर बांधण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा crime दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहिता माधुरी धनगर (वय-२१) यांचा विवाह कोल्ह ( ता.पाचोरा ) येथील पवन धनगर यांच्याशी मार्च २०२१ मध्ये झाला . लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, नंतर मात्र पती पवन धनगर याने विवाहितेला टोमणे मारणे सुरु केले. त्यानंतर घराच्या बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांचे परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ३ लाख रुपये देऊ शकले नाही.

या कारणावरून पती पवन धनगर याने शिवीगाळ करून मारहाण केली पैसे आणले नाही म्हणून सासू आणि सासरे यांनी विवाहितेला घरातून हाकलून दिले. २९ एप्रिलरोजी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती पवन धनगर, सासु कल्पना धनगर, सासरे बाबूलाल धनगर ( सर्व रा. कोल्ह ता. पाचोरा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!