एमआयडीसी पोलीसांकडून ३८ लाखांचा गांजा जप्त !
जळगाव (विशेष प्रतिनिधी)। एमआयडीसी पोलीसांनी तब्बल ३८ लाख १६ हजार रुपये किमतीचा गांजाची भुसावळकडुन जळगाव शहराकडे वाहतूक करणार्या ट्रकसह आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस उपधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, पोलिस निरीक्षक विनायक लोकरे , पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, इम्रान सय्यद, हेमंत कळसकर, सतीश गर्जे, हेमंत पाटील, सचिन पाटील, गोविंदा पाटील, विजय बावस्कर, निलेश पाटील, मुकेश पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापु रोहम, राजेंद्र मेढे प्रमोद लाड वंजारी, चालक धनगर भूषण सोनार यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव शहरातून एम.एच ४२ टी ९१२५ हा ट्रक गाजांने भरुन जात असल्याने त्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, यांच्यासह एमआयडीसी कर्मचार्यांच्या पथकाने महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ माहितीनुसार सापळा रचुन ट्रक अडवला. त्याची तपासणी केली असता, ट्रकमध्ये गांजाने भरलेले पोते मिळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून नेमका गांजा कोणचा, कुठे जात होता याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान, यात तब्बल ३८ लाख १६ हजार रूपयांचा गांजा आढळून आला आहे. गांजा आणि ट्रकसह पोलिसांनी मुख्तार रईम पटेल वय २४ रा. लोहारा ता. बाळापुर जि.अकोला या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.