तलवारीने दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या ताब्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। येथील तलवारीच्या धाक दाखवत दहशत माजविणारा व लग्नात हळदिच्या कार्यक्रमात हातात तलवार घेवून नाचणारा सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी, शहरातील हरिविठ्ठल नगर येथील प्रमोद शरद इंगळे (वय २६) हा काही दिवसांपूर्वी लग्नातील हळदीच्या डिजेच्या कार्यक्रमात हातात तलवार घेवून नाचत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झाला होता. तसेच प्रमोद इंगळे हा आज सकाळच्या सुमारास हातात तलवार घेवून बाजारपट्ट्याजवळ आरडाओरड करुन दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पंकज शिंदे यांना मिळाली असता त्यांनी लगेच पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती देताच त्यांनी प्रदिप पाटील, गोरखनाथ बागुल, महेश महाजन, विजय पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने प्रमोद इंगळेला अटक करीत त्याच्याकडून २ हजार रुपये किंमतीची धारदार तलवार हस्तगत करण्यात आली असून यासंदर्भात पोलीस कर्मचारी पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.