अल्पवयीन मुलीवर अत्याचारातील “त्या नराधमास” जळगावातुन अटक
मुक्ताईनगर-जळगाव प्रतिनिधी: मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तरूणाने अत्याचार केल्याची घटना दुपारी 12:40 वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी तरूणाला जळगावातील एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक असे की, आईवडीलांसह मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे राहत असलेली तर मध्यप्रदेशातील नेपानगर येथील रहिवाशी असलेली अल्पवयीन मुलगी आज दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास चप्पल घेण्यासाठी काकाच्या घराच्या बाजूला असलेल्या पिठाच्या गिरणीत गेली असता त्याठिकाणी आधीपासून दबा धरून असलेला काकांच्या घराच्या शेजारी राहत असलेला चेतन सुतार होता. त्याने मुलीचा हात पकडून तिच्या तोंडावर रूमाल बांधून मुलीवर बलात्कार केला. दरम्यान मुलीने पायाने पत्र्याच्या शेडला लाथा मारल्याने पत्र्यांच्या आवाजामुळे पिडीत मुलीचे आईवडील आले असता मुलीवर अत्याचार केल्याचे दिसून आले असता नातेवाईक आल्याचे पाहून चेतन सुतार हा घटनास्थळाहून पळ काढला. रात्री उशीरापर्यंत स्थानिक पोलीसांनी संशयित आरोपी चेतन सुतार याला अटक करण्यात आली असून आरोपी चेतन रवींद्र सुतार या आरोपीवर पोस्को कायदा व अनुसूचित जाती जमाती या कायद्याद्वारे गुन्हा नोंद करण्याचे काम मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.