लाच घेतांना सहाय्यक फौजदार नाशिक एसीबीच्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। पारोळा पोलिस ठाण्यातील लाचखोर एएसआय कर्मचाऱ्यावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई अटक केल्याने जळगाव पोलिस दलाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, पारोळा पोलिस ठाण्यातील (एएसआय) सहाय्यक फौजदार जगदीश विनायक पवार यांनी पारोळा ते अमळनेर प्रवासी वाहतूक करणार्या वाहनधारकावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ३०० रुपयांची लाचेची मागणी केली होती याप्रकरणी नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, प्रकाश महाजन, गरूड, गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा रचत लाच स्वीकारताना नाशिक एसीबीच्या पथकाने सहाय्यक फौजदार यास अटक केली आहे. नाशिक एसीबीच्या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.