विवाहितेचा १ लाखासाठी छळ; चार जणांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी)। येथिल माहेर असलेल्या मेहरूण अक्सानगर येथील २४ वर्षीय विवाहितेला घर खर्चासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी पतीसह चार जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईवडीलांकडे मेहरूण परिसरातील अक्सानगर येथे राहणारी २४ वर्षीय विवाहितेचे ठाणे येथील मुजाहीद शेख जाहीद यांच्याशी लग्न झाले आहे पती मुजाहीद शेख हे काम करत नसल्याने घरात पैसे येणे बंद झाले. दरम्यान घर खर्च करण्यासाठी विवाहिला तिचा पती मुजाहीत मारहाण करून माहेरहून १ लाख रूपये घेवून ये असे सांगितले. आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यावर सासरे शेख जाहीद कबीर, सासु नसरी बानो शेख जाहीद, दिर शोऐब शेख जाहीद सर्व रा.अलमास कॉलन कौसा, मुब्रा ठाणे यांनी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. माहेरहून पैसे आणले नाही तर तुला तलाक देवू अशी धमकी दिली. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता ही १२ डिसेंबर रोजी आईवडीलांकडे आली. आपल्यावर होणार छळ आईवडीलांना सांगितल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.