भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

विनापरवानगी डीजे वाजवने व जास्त नागरिकांची गर्दी केल्याने; डीजे जप्त, गुन्हा दाखल !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील आशाबाबा नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात विनापरवानगी डीजे वाजवल्या व ५० पेक्षा जास्त नागरिकांची गर्दी केल्या प्रकरणी रामानंदगनर पोलिसांनी कारवाई केली असून डीजे जप्त केला आहे. 

याबाबत सविस्तर असे की, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, चालक वासुदेव मोरे, पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे हे मंगळवारी दि.२३ रोजी मध्यरात्री गस्तीवर असतांना आशाबाबा नगर येथे बापूराव श्रावण पाटील यांच्या घरासमोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम चालू होता. व कार्यक्रमात (एम.एच. ४३ ए.डी.१७५) या क्रमांकाचे वाहन असलेला डीजे वाजत होता मात्र, सदरील डिजेची परवानगी नसल्याचे तपासात आढळून आले त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचे ५० पेक्षा जास्त नागरिकांनी लग्नसमारंभ कार्यक्रमात गर्दी करु नये असे आदेश असतांनाही याठिकाणी १०० ते १५० लोक गर्दी करुन नाचत असल्याचे आढळून आल्याने

पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करुन जिल्हाधिका यांचे आदेश उल्लंघन केल्या प्रकरणी लग्नाचे आयोजक बापूराव श्रावण पाटील रा. आशाबाबानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच विनापरवानी डीजे वाजविल्या प्रकरणी डी.जे मालक शालीक देवीदास कोळी रा. हिंगोणे सीम जळोद ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी डीजेवर कारवाई करत डीजे पोलीसांकडून जप्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!