क्राईमजळगाव

अंधाराचा फायदा घेत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; तरुणी गर्भवती

जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील एक अल्पवयीन १५ वर्षीय तरुणी रात्रीच्या वेळी दुकानावर दूध घेण्यासाठी जात असतांना तिचे तोंड दाबून अंधाराच्या ठिकाणी घेवून जात तिच्यावर अत्याचार केला या अत्याचारातून अल्पवयीन गर्भवती झाल्यानंतर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आहे.

शहरातील एक १५ वर्षीय अल्पवयीन तरुणी नोव्हेंबर महिन्यात एका दिवशी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही दूध आणण्यासाठी घरातून बाहेर गेली असता याचवेळी अनोळखी व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला तोंड दाबून  वाघनगर परिसरात एका मोकळ्या मैदानावर नेले व याठिकाणी नराधामाने अल्पवयीन तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केले. दरम्यान या अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर कुणीतरी अनोळखी व्यक्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी १० फेब्रुवारी रोजी पिडीतेच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस स्टेशनला अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!