जळगाव पुन्हा खुनाने हादरले : तरुणांवर धारदार शस्त्राने वार !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहर पुन्हा खुनाने हादरले असून सोमवारी पुन्हा शिवाजीनगर हुडकोजवळ खून झाला आहे. परिसरात खून झाल्याचे खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरात गेल्याच आठवड्यात दोन खून झाले होते. एकाच दिवशी झालेल्या दोन खुनांनी उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज जळगावात पुन्हा एकदा खून झाला आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास बर्फ फॅक्टरी गवळीवाडा जवळ मोहम्मद मुसेफ शेख इसाक वय-४० रा.हुडको या तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.
मुसेफ हा हुडको परिसरात राहून हमाली काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या वर्षभरापासून तो रिकामाच असल्याने परिसरात फिरत असे.नमाजसाठी नागरिक जात असताना घटना त्यांच्या लक्षात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथक पोहचले आहे. मयताजवळ चॉपरचे कव्हर, एका शस्त्राची मूठ, रुमाल असे साहित्य पडले आहे.
हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला आहे.