भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार,निर्णयाची उत्सुकता

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष,उपाध्यक्षपदावर कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय आज दुपारी ४ वाजेनंतर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला जाणार आहे . जिल्ह्याच्या राजकारणात या निर्णयाबद्दल उत्सुकता आहे .

तत्पूर्वी आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक होणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह नवनियुक्त संचालकांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला आणि या पदांसाठीची नावे निश्‍चीत होणार आहे. यामुळे या बैठकीत नेमके कुणाचे नाव समोर येते याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोण ?, हे ठरवण्याचे सर्वाधिकार एकनाथ खडसे यांना आहेत. ते संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत उमेदवाराचे नाव जाहीर करतील. शिवसेनेलाही त्यापूर्वी उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा लागणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला १०; शिवसेनेला ७ आणि कॉंग्रेसला ३ जागा मिळाल्या. भाजपचे एकमेव संचालक निवडून आले आहेत.उद्या बँकेत आयोजीत करण्यात आलेल्या विशेष बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐन वेळेस काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे किशोर पाटील, अमोल पाटील आदींची नावे चर्चेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!