भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोरुग्णाचा मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरातील गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून सोमवारी सकाळी ११ वाजता एका मनोरुग्णाने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला होता त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारस दाखल केले होते.त्याच्यावर उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला.

या बाबत अधिक माहिती अशी की,मृत पावलेल्या इसमाचे नाव ज्ञानेश्वर वामन सूर्यवंशी, रा.कमळगाव ता.चोपडा, असे असून त्याला पत्नी आणि तीन मुले आहेत. ज्ञानेश्वर सूर्यवंशी काही दिवसांपासून मानसिक आजारी असून डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी बहीण शोभाबाई राजाराम वाघ ( रा. गांधी मार्केट ) यांच्याकडे परिवारासह आले होते. एक महिन्यापासून ते कामावरून घरीच होते.कमळगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय येथे शिपाई म्हणून कार्यरत होते अनेक दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी परिवाराने त्यांना शनिवारी संध्याकाळी बहिणीकडे जळगावात आणले होते. सोमवारी रिंग रोडवरील एका दवाखान्यात मानसोपचार तज्ज्ज्ञांना दाखविणार होते.

तत्पूर्वी आज सकाळी ११ वाजता गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून ज्ञानेश्वर सूर्यवंशी याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला हात ,पाय फॅक्चर झाला छाती, पायाला व शरीराला मुका मार लागला आहे. त्याला राहुल भोई या व्यवसायिकाने तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासले शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव, डॉ.गोपाळ ढवळे आणि सहकारी त्याच्यावर उपचार करीत असताना आज दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी मृत्यू झाला याबाबतची माहिती शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!