प्रेम विवाहानंतर दोन दिवसातच तरुणींचा संशयास्पद मृतदेहाने खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पाळधी ता.धरणगाव। तालुक्यातील पाळधी येथील एका तरूणीने गावातीलच तरूणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, आरती विजय भोसले ( वय १९) राहणार पाळधी, ता. धरणगाव ही तरूणी ६ डिसेंबर २०२० पासून बेपत्ता झाली होती. दत्त जयंतीच्या दिवशी ती पाळधी गावातीलच प्रशांत पाटील या तरूणासोबत विवाह करून परतली. तिने प्रशांत सोबत प्रेम विवाह केला होता. दरम्यान, या घटनेला दोन दिवस होत नाही तोच आज सकाळी आरतीच्या आईला काही तरूणांनी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यानुसार त्यांनी सायलीच्या सासरी जाऊन पाहणी केली असता तिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. सासरच्या मंडळीने घातपात करून तिला मारून टाकल्याचा आरोप माहेरच्यांनी केला असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा तिच्या माहेरच्यांनी घेतला आहे.